कोकणात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात 42 विद्यार्थी जखमी चार गंभीर

Kolhapur news
By -

            


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

           


      कोकणात सहलीसाठी गेलेल्या  विद्यार्थ्यांच्या बसला  सहलीवरून परतत असताना  पुणे-बंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये ४२ विद्यार्थी जखमी झाले आहेत.पुणे-बंगळुरु हायवेवर काम सुरू असलेल्या सहलीची बस भराव पुलावरुन कोसळून बसमधील ४२ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.


नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले होते. कोकणातून नाशिकला परत येत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास बसचा अपघात झाला.वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत भराव पुलाचे काम सुरु आहे. पहाटे अंधार होता. त्यामुळे बस चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने बस भराव पुलावरून खाली कोसळली.


या अपघातात बस मधील ४२ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील चार विद्यार्थी गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण आणि महामार्ग मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाठार ग्रामस्थांनी त्यांना मदत केली.एकूण 42 विद्यार्थी जखमी आहेत. त्यापैकी 10 जणांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणि 32 जणांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. 4 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कॉलेजमधील मुली देखील सहलीला गेल्या होत्या. सुदैवाने त्यांची दुसरी बस होती. त्यामुळे त्या सुरक्षित आहेत.


                        ------------------