कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले ) येथे रहमान फौऊंडेशन व खिदमत फौऊंडेशन यांच्या वतीने कष्टकरी मजुरांना मोफत ब्लँकेट वाटप करणेत आले.
या प्रसंगी रेहमान फौऊंडेशन, कोल्हापूर चे अबूबकर मुल्ला, हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, मुनीर जमादार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन खिदमत फाऊंडेशनचे इरफान जमादार, समीर नायकवडी, इरफान कुरणे, आमिर पेंढारी,जुबेर बारगीर, रसुल खतीब,शमु मुल्ला यांनी केले होते.
रेहमान फौऊंडेशन कोल्हापूरचे अबूबकर मुल्ला, हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, मुनीर जमादार यांच्या हस्ते ब्लॅकेंट वाटप करतांना
-------------------------------


