कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विवेक वाहिनीच्या वतीने व्यसनमुक्ती अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना "द- दारूचा नाही, द- दुधाचा" असा संदेश देण्यासाठीचा उपक्रम डी. आर. माने. महाविद्यालयामध्ये राबविण्यात आला.
अंनिसच्या विवेक वाहिनी विभागाचे राज्य कार्यवाहक, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांनी "व्यसन आणि व्यसनांचे दुष्परिणाम" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोल्हापूर जिल्हा अंनिसच्या वतीने विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एल. कदम यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लखन भोगम यांनी मानले.अंनिसचे अंशुमन सुळगावकर यांनी विदयार्थ्यांना व्यसनमुक्तची शपथ दिली.कार्यक्रमाचे आभार प्रा.संदीप वाडीकर यांनी मानले.
या उपक्रमाच्या प्रसंगी विवेक वाहिनी प्रमुख डॉ. लखन भोगम, प्रा. विश्वजित खाडे, प्रा. अरुण कुंभार, प्रा रणजित पाटील यांच्यासह बुद्धभूषण सोनवले, तुषार सोनुले यांच्यासह विवेक वाहिनी आणि एनसीसी विभागामधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दूध वाटप करतेवेळी
----------------


