अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलने कमी कालावधीत केलेली नेत्रदीपक प्रगती उल्लेखनीय - मराठीतील नामवंत निर्माते, दिग्दर्शक अनुप जत्राटकर

Kolhapur news
By -

 

         


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


         अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलने कमी कालावधीतच केलेली नेत्रदीपक प्रगती उल्लेखनीय आहे गौरव उद्गार गाभ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केले. 


     निपाणीतील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख ते पाहुणे म्हणून बोलत होते. सनदी इंटरनॅशनल स्कूल जमखंडीचे प्रिन्सिपल चेतन अलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


  यावेळी सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले  यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने भविष्यात कोणते उपक्रम हाती घेतले जाणार आहेत याची सविस्तर माहिती दिली. 


      प्राचार्या सौ चेतना चौगुले, डॉक्टर उत्तम पाटील , संचालक डॉक्टर ज्योतिबा चौगुले ,सौ मीना शिंदे, सौ नम्रता चौगुले, चंद्रकांत खोत  यांच्यासह इतर उपस्थित होते. 


       अर्णव चव्हाण व सहुरा पठाण यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमांच्या मुळे पालकाच्या़ंमधून उत्तम प्रतिसाद मिळत होता. पालकांच्या मधून व्यक्त होणारे समाधान हेच प्राचार्या सौ चेतना चौगुले व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी  केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचा  उत्स्फूर्त अभिप्राय होता. विराज पाटील यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 



      -------------------------------