मुरगूड पत्रकार संघ कार्यालयास समरजितसिंह घाटगे यांची भेट.

Kolhapur news
By -

 

             




            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


        मुरगूड ता.कागल येथील  मुरगूड पत्रकार संघ कार्यालयास शाहू ग्रुप चे  अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी आज भेट दिली.सकाळी १० ते २ असा शुभेच्छा समारंभ ठेवण्यात आला होता.


  माजी खासदार संजय मंडलिक यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या आणि कापशी खोऱ्यातील एक सार्वजनिक कार्यक्रम संपला की आपण भेटीसाठी येणार असल्याचे सांगितले.नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील यांचे पती प्रवीणसिंह पाटील हे आजारी असलेने त्यांनी प्रतिनिधी मार्फत शुभेच्छा पाठवल्या.नाम.मुश्रीफ यांनी ही आपल्या प्रतिनिधी (पुतण्या)मार्फत शुभेच्छा दिल्या. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


    मुरगूड चे जवळजवळ सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांनी कार्यालयास समक्ष भेट  देऊन शुभेच्छा दिल्या. सर्व निमंत्रित मान्यवरांना पत्रकार संघामार्फत शिरा,उप्पीट,मसाला दूध देण्यात आले.


    भेट दिलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये सामाजिक समरसतेत पत्रकारांचे महत्व विशद केले. निष्पक्ष पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ मानला जातो असे मत या मान्यवरांनी मनोगतात विशद केले.


        --------------------------------