औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणाऱ्या संताजी घोरपडे यांचे स्मारक केंव्हाच व्हायला हवे होते : अजितदादांची भावनिक प्रतिक्रिया.

Kolhapur news
By -

 

            

          



             कोल्हापूर न्यूज  /  वि .रा.भोसले


  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील सेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारका साठी अजितदादा यांनी आठ कोटींचा निधी मिळवून दिला. "एवढा अद्वितीय योद्धा अजून कसा उपेक्षित राहिला?. औरंगजेबाच्या  तंबूचे कळस कापून आणणाऱ्या या शूर सेनापतीचे स्मारक केंव्हाच व्हायला हवे होते." असे भावपूर्ण उद्गार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित दादांनी मंत्रालयातल्या आपल्या केबिनमध्ये काढले होते. त्यांच्यासमोर होते स्मारक समितीचे सचिव शशिकांत खोत आणि ना. हसन मुश्रीफ.


    समितीने सेनापती संताजी घोरपडे यांच्या अद्वितीय शौर्याची गाथा  जेव्हा दादांना ऐकवली तेव्हा त्यांच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज चमकले. त्यांनी लगेच सचिवांना बोलावून घेतले आणि सांगितले आपल्याला हे स्मारक करायचे आहे. ग्रामस्थ आले आहेत समितीकडून सर्व वृत्तांत आणि संताजींचा इतिहास समजावून घ्या.प्रस्ताव मागवून घेऊन लागोलग कार्यवाहीच्या मागे लागा. दादांच्या कामाची पद्धतच तलावारिंच्या धारे सारखी होती.एक घाव दोन तुकडे.सेनापती संताजी घोरपड्यांच्या घराण्याचा सर्व इतिहास समितीने शोधून काढला. त्यासाठी. अनेक ऐतिहासिक बखरी, लेख, पुस्तके, पालथी घातली, इतिहासाकारांच्या व्यक्तिगत भेटी घेतल्या, त्यासाठी वीस तीस मिटींगा झाल्या. 


जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्मारक स्थळाची पहाणी झाली. आराखडा तयार झाला. अर्थ मंत्रालय आणि तत्सम विविध शाखाना  प्रस्ताव सादर करण्यात आला. आणि अवघ्या दोन वर्षात संताजी  घोरपडे यांचे भव्य स्मारक से. कापशी येथे साकारले. आश्वारूढ पुतळा, संग्रहालाय, ऐतिहासिक वस्तू, आणि सभागृह  समोर सुंदर  जलाशय. या जलाशयात संताजींचे आश्वारूढ प्रतिबिंब दिसू लागते. हलक्या  लाटांबरोबर ते खेळत राहते आणि  ते पहाणाऱ्या पर्यटकाच्या तोंडून सहज मोगली सरदारांचे ते ऐतिहासिक उद्गार बाहेर पडतात.पाण्याच्या काठावर थबकलेल्या घोड्यांना  उद्देशून ते म्हणतात. "पाण्यात तुम्हांला काय धनाजी संताजी दिसतात काय?"


    या प्रेरणादायी शूर विराला दादांनी जणू  स्वर्गातून धरती वर उतरवले. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या या स्मारकाला भेट देण्यासाठी दादा पुन्हा कापशीला येणार होते असे  शशिकांत खोत यांनी सांगितले.. समोरच्या तलावात रंगीत कारंजे निर्मिती साठी त्यांनी पुन्हा  अडीच कोटी मंजूर केले होते. दादांच्या हस्ते कारंज्याचे उदघाटन करायचे होते.त्या आधीच दादांचे अपघाती अचानक, न सांगता निर्वाण झाले. सामान्यांच्या  आयुष्यात आनंदाचे कारंजे निर्माण करणाऱ्या या राजकीय सेनापतीची एक्सिट ह्रदयाला चिरून गेली. हसन मुश्रीफ  ढसा ढसा रडले. हे सगळं सांगतांना शशिकांत खोत रुमालाने डोळे पुसत होते.  1987 पासून 35 वर्षे सुरु असलेल्या ग्रामस्थांच्या  प्रयत्नांना आणि स्वप्नांना दादांनी अवघ्या दोन वर्षात मूर्त रुप दिले होते.

    

           ------------------------------