१९ जानेवारीपासून कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह : प्रजासत्ताकदिनी जिल्हा-तालुका-गाव कॉपीमुक्त करण्याची घेणार शपथ! : विद्यार्थ्यांसमवेत पालक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींचाही सहभाग : २० जानेवारीपासून दहावीची प्रवेशपत्रे उपलब्ध.

Kolhapur news
By -

 

                   


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


       येत्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणारी बोर्ड परीक्षा गैरप्रकारमुक्त होण्यासाठी राज्यमंडळांने १९ ते २६ जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यात शाळा गाव तालुका जिल्हास्तरावर कॉपीमुक्तीची शपथ प्रजासत्ताकदिनी होणार आहे. दरम्यान दहावीची प्रवेश पत्रे २० जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा!! कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह !!

(कालावधी-सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ ते सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६)

१९ जाने: स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा/कनिष्ठ गावातील महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करणेबाबत प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी माहिती देणे.


२० जाने:कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाचे वेळी घेणे. 


 २१ जाने: शाळास्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे, मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचना, व प्रवेश पवावरील (Hall Ticket) सूचनांचे वाचन करणे. गैरमार्ग केल्यास होणाच्या परिणामांची जाणीव करून देणे.


२२ जाने:परीक्षा काळात विद्याध्यानी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी यायावत तज्ज्ञांमार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्‌द्योधन करणे,


२३ जाने:परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत विद्याच्यांना दाखविणे


२४ जाने:कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढणे.


२६ जाने:ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक/शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात वरील विषयांबाबत माहिती देणे व यावाचत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रतस्थांना आवाहन करा विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांनी शपथ घेणे.


विद्यार्थ्यांनी घ्यावयाची शपथ


मी शपथ घेतो/घेते की, मी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.

जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन, परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूबनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन. तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भिडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडीलांचे व गुरूजनांचे नाव उज्ज्वल करेन.


२६ जानेवारी, २०२६ रोजीच्या प्रजासत्ताकदिनी जिल्हास्तरावरील मध्यवर्ती शासकीय कार्यक्रमामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे वेळी घ्यावयाची शपथ


आम्ही सर्व नागरीक गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, इ. १०वी व इ. १२ वी च्या परीक्षेदरम्यान कॉपी किंवा इतर कोणताही गैरप्रकार होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून परावृत्त करू. राज्य मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानामध्ये सक्रिय सहभागी होऊन, आपला जिल्हा कॉपीमुक्त करू. तसेच शिक्षणक्षेत्रातील या व अशा अपप्रवृत्तींना कायमचा आळा घालू.


अशीच शपथ प्रजासत्ताक दिनी गाव व तालुका पातळीवर घेण्यात येणार आहे. 


 फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन स्वरूपात २० जानेवारीपासून शाळांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


माध्यमिक शाळांनी इ.१० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

 विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.  प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मठिकाण याबाबत दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या शाळांना ऑनलाइन पद्धतीने त्या करता येणार आहेत. विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर राज्य मंडळाकडून सुधारित प्रवेशपत्र देण्यात येतील,मात्र विषय किंवा माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात शाळांनी प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात येतील.

फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे. आवेदन पत्र रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरीत करू नयेत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.


               --------------------------