कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सौ. शांतादेवी डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आज डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी, तळसंदे येथे आयोजित सौ. शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटल उद्घाटन सोहळा आणि ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप पुरस्कार वितरण समारंभ 2025-26’ हा कार्यक्रम पद्मश्री डॉ. डी वाय. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे चान्सलर पी. डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील , विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
डी. वाय पाटील ग्रुपकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. यावर्षी एकूण 230 विद्यार्थ्यांना 4 कोटी 36 लाखांची स्कॉलरशीप विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली.
---------------------------


