कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
निवडणुकीत निवडून देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन असे आश्वासन हेरले चे नूतन जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांनी दिले.
उर्दू विद्यामंदिर हेरले येथे नूतन जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे आणि नूतन पंचायत समितीचे सदस्य सुकुमार जाधव यांचा सत्कार करणेत आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी माजी जिप सदस्य बबलू मकंदार ,उद्योगपती इक्बाल देसाई , मुनिर जमादार ,उपसरपंच निळोफर खतीब तंटा मुक्त अध्यक्ष अमर वड,इरफान जमादार ,आरिफ खतीब ,समीर खतीब ,डॉ नौशाद जमादार ,मुस्लिम समाज चैरमा न टिपू सुलतान खतीब , रुकडीचे राजू मुल्ला अल्लाउद्दीन खतीब ,इब्राहिम खतीब उपस्थित होते,मुख्याध्यापक उस्मान पटेल यांनी स्वागत केलं तर गुलाब शिकलगार यांनी आभार मानले .
----------------------

