कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड ता. कागल येथे बाजारपेठ मध्ये शिवप्रेमीतर्फे छ. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी ठि.१० वाजता. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक विजय सापळे यांच्या शुभहस्ते व प्रा.आनंदराव कल्याणकर ,सौ. विद्या पॅलीस फर्नांडिस (उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या मालवण शहर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर “छ.शिवरायांचे आज्ञा पत्र" या विषयावर प्रा.विनय कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले.
यानंतर सौ. समिरा जमादार, सौ. माया मोरबाळे, सौ रंजना देवळे, नगरसेविका सौ. विजयमाला शिंदे सौ. वैशाली गोधडे, नगरसेवक सुनील रणवरे, राहुल शिंदे तसेच श्री. शंकर कांबळे, आकाश दरेकर ( इंजिनियर), गौरव मोर्चे, जॉन्सन बारदेस्कर, अमर देवळे या मान्यवरांच्या उपस्थितीत माजी निवृत्त शिक्षक पती पत्नीसह सत्कार करण्यात आला.समारंभाचे आयोजन शिवभक्त धोंडीराम शिंदे,परीट यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.सर्व उपस्थित नागरिकांनी शिवप्रतिमेला फुले वाहून वंदन केले. पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात आला. शिवभक्तांच्या मार्फत भोजनाची सुद्धा सोय करण्यात आली होती.भगव्या पताका,भगवे फेटे,भगव्या टोप्या आणि शिवरायांच्या जयजयकाराने वातावरण शिवमय झाले होते.नगरपरिषदे समोरील आश्वारूढ पुतळ्याला सुद्धा महिला पुरुष नागरिकांनी अभिवादन केले.यावेळी धोंडीराम परीट यांचा ही सत्कार करण्यात आला.
--------------------------------


