कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील छत्रपती शिवाजी सोसायटी, छत्रपती शिवाजी महाराज दूध संस्था व शेतकरी सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन रुकडी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे व हेरले पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांचा सत्कार छत्रपती ग्रुपचे सर्वेसर्वा माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, शितल खोत, छत्रपती शिवाजी सोसायटीचे चेअरमन कपिल भोसले, व्हा. चेअरमन स्वप्नील कोळेकर, माजी चेअरमन अशोक मुंडे, छत्रपती शिवाजी महाराज दूध संस्थेचे चेअरमन सुनिल खोचगे , व्हा. चेअरमन रवी माने, शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले, व्हा. चेअरमन लक्ष्मण निंबाळकर,मुनिर जमादार, गुरुनाथ नाईक, सुरज पाटील, नंदकुमार माने, रवी मिरजे, अक्षय इंगळे, आनंदा गवळी, पोपटे शिंदे, विजय मगदूम आदीसह संस्थेचे संचालक उपस्थित होते.
हेरले : येथे छत्रपती ग्रुपचे सर्वेसर्वा माजी सभापती राजेश पाटील नुतन रुकडी जिल्हा परिषद सदस्य अतिष शिंगे व हेरले पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांचा सत्कार करतांना शेजारी अन्य मान्यवर.
----------------------


