कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली CSR उपक्रमांतर्गत Rotary Club या स्वयंसेवी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या विशेष शस्त्रक्रिया अभियानासाठी रोटरी क्लबच्या विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा, मूत्ररोग, ऑर्थोपेडीक तसेच इतर सर्वसाधारण शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले या सहा तालुक्यांतील तपासणीत पात्र ठरलेल्या रुग्णांवर 9 ते 14 मार्च या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
शस्त्रक्रियेसाठी इच्छुक रुग्णांनी संबंधित तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासणी करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.
-------------------------------
00000

