राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख यांची तारळे च्या शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बारावी परीक्षा केंद्रास भेट

Kolhapur news
By -

 

           


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


   राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख यांनी तारळे च्या शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बारावी परीक्षा केंद्रास भेट दिली. 

      

     बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाकडून भरारी पथकांचे नियोजन केले आहे. तसेच महसूल विभागाकडून बारावी परीक्षा  कॉपी मुक्त अभियानातंर्गत बारावी परीक्षा केंद्रास भरारी पथकाच्या माध्यमातून राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख यांनी भेट दिली. या केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नाही. 


परीक्षा केंद्रावरती प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून शांततापूर्वक व सुरळीतपणे बारावी परीक्षा सुरू आहे. केंद्रसंचालक व पर्यवेक्षक आपले कर्तव्य उत्कृष्ट बजावत आहेत. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

     

              --------------------