एम जे इंटर नॅशनल स्कूल च्या तीन विदयार्थीनिंची राज्य स्तरीय मार्शल आर्ट स्पर्धे साठी निवड..

Kolhapur news
By -

 

                


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


      मुरगूड येथील एम जे इंटर नॅशनल स्कूल च्या तीन विदयार्थिनींची राज्य स्तरीय मार्शल आर्ट स्पर्धे साठी निवड झाली आहे.शस्त्रांग मार्शल आर्ट या खेळाच्या विभागीय स्पर्धा सरवडे तालुका राधानगरी येथे नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेत या शाळेच्या मना जमादार,स्वरांजली भराडे व प्रांजल भोकरे यांनी प्रथम क्रमांकाची सुवर्णपदके पटकावली. 


    छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या तिघींची  निवड झाली आहे.


    या मुलींना कोच महेश पवार व अजय सरवदे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम मकानदार आणि चेअरमन जावेद मकानदार यांनी अभिनंदन करून प्रोत्साहन दिले आहे.




                      --------------------