कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड ता. कागल येथील वैष्णवी संजय पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षा मधून वर्ग एकच्या विभागीय कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मुरगूडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रवीणसिंह पाटील म्हणाले परिस्थिती बेताची असताना सुद्धा त्यावर मात करत वैष्णवी ने मिळवलेले यश हे आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे असेच आहे.अशा पद्धतीने आजच्या पिढीने अभ्यासाची कास धरून व ध्येय उराशी बाळगून उच्चपदस्थ अधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
यावेळी नगरसेवक रणजीत भारमल,जगन्नाथ पुजारी,संजय मोरबाळे, गणपती लोकरे,राजेंद्र चव्हाण,सम्राट म्हसवेकर,बळीराम डेळेकर,सुधीर सावर्डेकर अमोल पाटील, विजय मेंडके, राहुल कांबळे, वैष्णवीचे वडील संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आभार पैलवान राजू चव्हाण यांनी मांनले.
-------------------

