मुरगूड मध्ये महाशिवरात्री उत्सव जल्लोषात. ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाचा अप्रतिम देखावा.

Kolhapur news
By -

 

          


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


      मुरगूड मध्ये आज महाशिवरात्री उत्सव अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला.प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाने अप्रतिम देखावा सादर केला होता. यात नऊ फुटाचे भव्य शिवलिंग विविध प्रकारच्या फुलमालांनी अच्छादीत  केले होते.. या शिवाय आरशांच्या सहाय्याने सहश्र शिवलिंग प्रतिमांचा विलोभनीय नजारा भाविकांचे  लक्ष वेधून घेत होता. विद्यालयाच्या  प्रमुख लता बहेनजी,  सहाय्य्क लक्ष्मी बहेनजी, यांच्या निर्देशां नुसार अनिल आंगज व राजेंद्र कांबळे या कलाकार भाईंनी हा दिव्य देखावा सादर केला. त्यांना भिकाजीं भांदीगरे, संभाजी पाटील, दिनेश तारक, सागर नाधवडे, विलास करडे व भांबरे भाई यांचे मौलिक सहकार्य लाभले. भक्तगगणांच्या डोळयांचे पारणें फेडावे असा हा देखावा पाहण्यासाठी शहर व पंचक्रीशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


    याशिवाय महादेव गल्ली, तुकाराम चौक, माधव नगर, गुरव गल्ली, अवचित वाडी मठ येथील महाशिवरात्री उत्सव सुद्धा जल्लोषात संपन्न झाले. हलगी, ताशा, आणि पारंपारिक वाद्ये यामुळे उत्सवा चे  वैभव अधिकच खुलून गेले. भक्तांना सर्वत्र खिचडी व केळी वाटण्यात आली.


   लता बहेनजी नी महाशिवरात्रीचे अनन्य साधारण महत्व समजावून सांगितले. देवासूर युद्धात समुद्र मंथनातून बाहेर पडलेले विष भगवान शंकरांनी प्राशन केल्याने त्यांचा कंठ निळा झाला त्यामुळे त्यांना नीलकंठ असे ही म्हणतात. नीलकंठ महादेवाला पार्वतीने पती म्हणून स्वीकारले. महाशिवरात्री ला  शंकर पार्वती चा विवाह झाला.


   महा पराक्रमी पण उद्दाम व अहंकारी रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्र यांनी शंकराची आराधना रामेश्वर येथे केली होती.या अध्यात्मिक आणि मांगलीक उत्सवात हजारो भाविक दिवसाभर  सहभागी झाले होते.



   

                  -----------------------