कोल्हापूर न्यूज नेटवर्क
रायगड : पत्रकारांच्या विविध सेवा,, प्रवास योजना यासाठी दिल्लीच्या केंद्र स्तरावर आपण प्रयत्न करत असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत येथील पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्त वक्तव्य केले. तर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुका कार्यक्षेत्रात पत्रकार भवन उभारणार असल्याचे व्यक्त्यव्य कर्जत येथे केले.
पत्रकारांनी आपली शोध पत्रकारिता अखंड चालू ठेवायला हवी मात्र यात आपण कमी पडलो त्याचा फायदा पुढारी नेते घ्यायला लागतात. पत्रकारांनी जे जे नवीन साधन येईल ते ते शिकायला हवे. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे योगदान भरीव आहे त्यासाठी एस एम देशमुख यांचे प्रयत्न अफाट आहेत असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत देसाई यांनी येथे सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे यापुढील अधिवेशन उदगीर तालुका येथे एप्रिल महिन्यात होणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यातून आपण सातशे पेक्षा जास्त पत्रकार ह्या गुण गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहिले तसेच आजच्या कर्जत आयोजक प्रेस क्लबचे उत्कृष्ठ नियोजना बद्दल आभार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आपल्या भाषणातून मानले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित, रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे रॉयल गार्डन येथे पार पडला.
यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे,, माजी आमदार सुरेश लाड, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,विश्वस्त शरद पाबळे, किरण नाईक, परिषदेचे कार्यध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई,,पत्रकार मंदार फणसे, परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर,डिजिटल मीडिया चे अध्यक्ष अनिल वाघमारे,रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्यध्यक्ष संजय मोहिते, कर्जतचे उपनगराध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष भारत रंजणकर, कोकण विभाग अध्यक्ष अनिल भोळे, व नगरसेविका,
उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे सजविलेल्या गाडीने वाजत गाजत आणून ढोल ताशापथकाने मिरवणूक व्यासपीठावर आणण्यात आली.
पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी वेळात वेळ काढून कर्जत येथे आलो. जेष्ठ पत्रकार यांना रेल्वे प्रवास सुविधा मिळावी यासाठी दिल्ली येथे प्रयत्न केले.. आपण पत्रकार फार मोठ्या कष्टाने, प्रसंगी जीव धोक्यात घालून पत्रकारिता करता याबद्दल पत्रकरांना धन्यवाद व्यक्त करतो. असे खासदार श्रीरंग बारणे यांनी येथे व्यक्त केले.
पत्रकार परिषदेने केलेल्या कार्यक्रमाचा आढावा आणि शासनाकडे केलेला पाठपुरावा परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांनी प्रस्ताविकात येथे सांगितला. तर विश्वस्त किरण नाईक यांनी संघटनेच्या पूर्णता स्थापने पासून आता डिजिटल पत्रकारांच्या कार्याचा आढावा घेतला.
लोकशाही चे तीन स्तंभ जरी कारभार चालवीत असले तरी त्यांचा कारभार कुठे चुकत आहे कुठे कमी पडत आहे. यावर लेखणीच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारिता हा चौथा स्तंभ चोख करित आहे. यापुढेही पत्रकारांनी निर्भयपणे विषय मांडावेत अशी अपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांनी या व्यासपीठावरून केली.
माझ्या कर्जत तालुका कार्यक्षेत्रात पत्रकारासाठी पत्रकार भवन अद्यायावत उभारणार असल्याचेही आमदारांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील प्रेस क्लबच्या कार्याचा आढावा व नियोजन व्यवस्था उत्तम करणाऱ्या कर्जत प्रेस क्लब चे आभार मानत असल्याचे परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी येथे स्पष्ट केले.
तर प्रमुख पाहुणे न्यूज मराठी चे संपादक मंदार फणसे यांनी कधीही एकत्र येणाऱ्या पुढाऱ्यांच्या वृत्तीचा अनुभव घेत पत्रकारांनीही एकत्र यावे असे आवाहन येथे केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने यावर्षी दिल्या गेलेला पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ म्हणून *जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा परभणी जिल्हा पत्रकार संघाला मान्यवराचे हस्ते देण्यात आला. तर राज्यातून तालुका स्तरीय
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार पुढील पत्रकार संघाना देण्यात आले.
*नागपूर विभाग* : बेला तालुका पत्रकार संघ जिल्हा नागपूर
*नागपूर विभाग* : चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि.
गडचिरोली
*नाशिक विभाग* : नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघ जिल्हा नाशिक
*कोंकण विभाग* : पनवेल महानगर प्रेस क्लब जि. रायगड
*पुणे विभाग* : आंबेगाव तालुका पत्रकार संघ जि. पुणे
*लातूर विभाग* : किनवट तालुका पत्रकार संघ जि. नांदेड
*संभाजीनगर विभाग* : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ जि.बीड
*अमरावती विभाग* : संग्रामपूर तालुका पत्रकार संघ जि.बुलढाणा
*कोल्हापूर विभाग* : पलूस तालुका मराठी पत्रकार संघ जि. सांगली.
*मुंबई विभाग* : मुंबई उपनगर पत्रकार संघ,
व रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, व
मुरुड तालुका प्रेस क्लब यांचे विशेष सत्कार सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या
आयोजनासाठी कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, कार्यध्यक्ष विलास श्रीखंडे, सल्ला गार विजय मांडे, अजय गायकवाड, राहुल देशमुख, अनिल जावळे, विदयानंद ओव्हाळ, मल्हार पवार, अतुल माळी यासंह अनेक पत्रकार यांनी उत्तम आयोजन नियोजन केले.
--------------------




