कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन एम एम एस 2025 /26) मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड ता. कागल मधील आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. तब्बल २५ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक बनले असून कागल तालुक्यात प्रथम क्रमांकाने निकाल लागल्याने पालक शिक्षक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेले तीन वर्ष एन एम एम एस निकालाची परंपरा विद्यालयाने याही वर्षी कायम राखली आहे. या 25 विद्यार्थ्यांना चार वर्षात 12 लाखाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली . आत्तापर्यंत मुरगुड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सव्वा कोटीची शिष्यवृत्ती मिळवली आहे. यावर्षीच्या निकालात चे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याची मेरिट वाढले आहे यावर्षी या शाळेचे 100 गुणांच्या वरती 127 विद्यार्थी आहेत.
यावर्षी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये...आराध्या प्रदीप सोरप 160 गुण (मुरगूड),राधिका सूर्यकांत वळीवडे 155 गुण (चिमगाव),
पृथ्वीराज रणजीत कापसे 152 गुण (मुरगूड),स्वरांजली सागर पाटील 151 गुण (यमगे ),स्वरांजली गणेश लाड 151 गुण (करंजीवणे),पायल अमर ढेरे 147 गुण (मुरगूड),गुरुराज गजानन खराडे 144 गुण (शिंदेवाडी),समृद्धी संतोष मोरे 143 गुण (मुरगूड),सोहम सागर पाटील 142 गुण (सुरुपली),वरद अनिल कानकेकर 141 गुण (राधानगरी),स्वरांजली जयवंत रामाने 141 गुण (कुर),साईनाथ गणपती कमळकर 139 गुण (सुरुपली),
विजया सागर मगदूम 139 गुण (केनवडे),
सुयश संभाजी खतकर 139 गुण ( भडगाव ),स्नेहलता बळवंत एकल 137 गुण (चिमगाव),वैष्णव प्रमोद चौगुले 137 गुण (भडगाव),वैष्णवी सतीश वडर 136 गुण (निढोरी ),समर्थ पांडुरंग पाटील 135 गुण (मळगे खुर्द),
प्रणाली रामचंद्र पाटील 134 गुण(सुरुपली),रविराज ज्योतीराम वाघमोडे 132 गुण (वाघापूर),अनिल दगडू डोणे 132 गुण (यमगे ),समरजीत भरत लाड 132 गुण (मुरगूड),उद्धव मारुती पुरीबुवा 129 गुण (चिमगाव),श्रेयश विशाल पवार 111 गुण (निढोरी),सुजित सूर्यकांत डवरी 76 गुण (हमीदवाडा) यांचा समावेश आहे
या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई,युवा नेते कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई,प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे,कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर,शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, उपप्राचार्य व्ही. जी.घोरपडे, उपमुख्याध्यापक एस.बी.सुर्यवंशी पर्यवेक्षक एस. डी. साठे,तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे,बी.के वाघमोडे, एम. एस. कांबळे,एन एम एम एस विभाग प्रमुख अनिल पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------------------

