कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
शिवरायांचा एकेरी उल्लेख केला ही मोठी चुकच आहे. पण कोणी केला? आमदार गायकवाडनी तर तसा उल्लेख केलेलाच नाही. उलट एकेरी उल्लेख असलेले शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांना त्यांनी शिव्या घातल्या. तीनशे किलोमीटर अंतरावरून फोन वर झालेले त्या दोघांचे बोलणे महाराष्ट्राने ऐकले आहे. हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी 40 वर्षांपूर्वी लिहिले आहे. शिवरायांना साऱ्या महाराष्ट्रानेच काय पण देशाने दैवत मानले आहे. त्यांचे तेजस्वी पर्व अवघे 50 वर्षाचे होऊन गेले. तेवढ्या अवधीत त्यांनी एक स्वाभिमानाचे, अस्मितेचे एक युग निर्माण केले. म्हणून त्यांना युग प्रवर्तक म्हणतात. ते नसते तर आज हिंदूंची अवस्था काय झाली असती ते येथे सांगण्याची गरज नाही असे लाखो वेळा शिव भक्तांनी बोलून दाखवले असेल .
अशा या राष्ट्र पुरुषांची प्रतिमा घेऊन राजकारण करणे निंदनीय आहे.डाव्या विचारांच्या कम्युनिस्ट लोकांनी त्यांचा उल्लेख एकेरी केला आहे. त्यांच्या मते धर्म म्हणजे एक अफूची गोळी आहे.थोडक्यात धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे त्यांच्या दृष्टीने एखादा गल्ली वाला असल्या सारखे आहेत. म्हणून ते शिवरायांचा एकेरी उल्लेख करतात. त्यांच्या इतके शहाणे तेच असतात. समाजात असे तीन चार टक्के लोक असतात.राजकीय विरोधकांनी शिवरायांच्या कीर्तीला डाग लागेल असे आकांड तांडव करण्याची गरज नाही. परवा केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन नावाचा खेळ खंडोबा केला आणि वर निषेध मोर्चे काढून ट्राफिक जॅम केले.अशा गोष्टीला जरूर विरोध करावा. त्यामुळे उलट विरोधकांची एक सकारात्मक प्रतिमा समाजात तयार होईल.
असो महत्वाचा मुद्दा पुढे आहे.
विरोधकांना चमकोगिरी हवी असते. सूर्याला आव्हान दिल्याशिवाय चमकणार कसे ? मग ते सपकाळ असोत, रोहित पवार असोत किंवा संजय राऊत असोत. टीव्ही, वृतपत्रे त्यांना झळकवतातच.
धिरेंद्र शाश्त्री उर्फ बाबा बागेश्वर यांनी शिवरायांची अनेक वेळा आपल्या कथा वाचनातून प्रशंशा केली आहे. केवळ भारतातच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, ओमान या देशात सुद्धा त्यांनी सनातन धर्माचा प्रचार करताना शिव छत्रपती, राणा प्रतापसिंह, यांचा जयजयकार केला आहे.मध्य प्रदेशात 100 खाटांचे 200 कोटींचे मोफत कॅन्सर हॉस्पिटल ते उभे करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्या हॉस्पीटलचा शिलान्यास केला आहे.चारशे गरीब कन्या विवाह त्यांच्या धाम ने केले आहेत.राष्ट्रपती मुर्मू यांनी सुद्धा या कन्याविवाह सोहळ्याना उपस्थिती लावली आहे. त्या गरीब मुलींना त्यांनीही दिल्ली हून साड्या आणल्या होत्या.हिंदू संघटनासाठी दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा धिरेंद्र शास्त्री नी काढली होती. लाखो लोक त्यात सामील झाले होते. अनेज मुस्लिम सुद्धा त्यांचे भक्त. आहेत.अतिरेकी आणि धर्मांतर यावर ते परखड बोलतात. महिलांना माता भगिनी मानतात.
नागपूरच्या भाषणात धिरेंद्र शास्त्रीनी फक्त रामदास स्वामींचा उल्लेख केला एवढेच.बाबासाहेब पुरंदरे यांना सुद्धा पूर्वी याच विषयावर घेरले होते. रामदास स्वामी, तुकाराम महाराज, हे समकालीन संत होते. त्यात रामदास स्वामी ब्राम्हण होते एवढेच. कांही राजकीय नेत्यांनी सतत जाती भेदाचे राजकारण करून सत्तेचा पादाम कित्येक वर्षे जवळ केला होता.जे अल्पसंख्यांक असतील त्यांना बाजूला केले की झाले. सत्ता आपलीच. हे लोक पहेलगाम च्या अतिरक्यावर कमी बोलतील पण रामदास स्वामीवर जास्त बोलतील. प्रसिद्धी मिळते ना! विकासाचे कसलेही व्हिजन नसलेले हे नेते शिवरायांना वेठीस धरतात हे दुर्दैव आहे.गायकवाड किंवा धिरेंद्र शास्त्री यांचा शिवरायांचा अवमान करण्याचा कदापिही उद्देश नव्हता.गायकवाडनी 40 वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त पुस्तकाची पाने उघडली तर धीरेंद्र शास्त्रींनी अनवधानाने रामदास स्वामींची पाने उघडली.विरोधकांनी लगेच उघड्या अंगावर चाबूक मारून घेत लाडलक्ष्मी चा खेळ सुरु केला.
शिवरायाना त्यांनी वेठीस धरू नये. ते एक थोर युगपुरुष आहेत.महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यातील ते दैवत आहेत.
--------------------------

