कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले/ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघाचा सर्वोच्च मानाचा समजला जाणारा 'कला महर्षी' पुरस्कार मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील दत्तात्रय धोंगे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांची कन्या मानसी दत्तात्रय धोंगे हिने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत 'ब' गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाला.
कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभात कलेच्या क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षक नेते दादासाहेब लाड, उद्योजक संग्राम पाटील, उद्योजक संजय थोरवत ,उद्योजक विठ्ठल पाटील, उद्योजक निशिकांतसाळवेकर चित्रकार बबन माने चित्रकार प्रविन वाघमारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
एकीकडे दत्तात्रय धोंगे यांना त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेबद्दल सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले, तर दुसरीकडे त्याच समारंभात त्यांच्या कन्या, प्राथमिक विद्यामंदिर, मौजे वडगाव येथील विद्यार्थिनी कु. मानसी दत्तात्रय धोंगे हिने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत 'ब' गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
एकाच कुटुंबातील पिता आणि पुत्री या दोघांनीही कलेच्या क्षेत्रात एकाच व्यासपीठावर यश संपादन केल्याने या दुहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघातर्फे धोंगे पिता-पुत्रीचा गौरव करतांना शिक्षक नेते दादासाहेब लाड व अन्य मान्यवर.
--------------





