जिल्ह्यातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी दिली ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा

Kolhapur news
By -

              



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत दि.  २६ रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ वी) आयोजित करणेत आली होती. सदरची परीक्षा कोल्हापूर जिल्हयातील इयत्ता ४ थी  १६७ परीक्षा केंद्रांवर व इयत्ता ७ वी साठी 1 १३७ अशा एकूण  ३०४ केंद्रावर घेणेत आली. सदर परीक्षेला इयत्ता ४ थी चे ९८.६० टक्के व इयत्ता ७ वी चे  ९८.३८ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.


जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी  डॉ. मीना शेंडकर यांनी माहिती प्रसिद्धीस दिली.


   इयत्ता ४थी १६७ केंद्रा वरती एकूण परिक्षार्थी विद्यार्थी संख्या २६२६८ होती.उपस्थित विद्यार्थी संख्या - २५९०१ इतकी होती.

इयत्ता ७ वी १३७  केंद्रावरती एकूण परिक्षार्थी विद्यार्थी संख्या २२६४८ होती .उपस्थित विद्यार्थी संख्या २२२८२ इतकी होती.एकूण ३०४ केंद्रावरती एकूण परिक्षार्थी संख्या ४८९१६ तर उपस्थित विद्यार्थी संख्या ४८१४३ इतकी होती.


  ही  परीक्षा सुरळीत पार पडणेकरीता  ३०४ केंद्र संचालकांची जिल्हा स्तरावरुन नियुक्ती करणेत आली होती. सदर परीक्षेमध्ये मराठी, उर्दु, इंग्रजी या तीन माध्यमांकरिता बहुसंची (ABCD) व उर्वरित हिंदी, गुजराती, तेलुगु व कन्नड या चार माध्यमांकरिता केवळ A संचामध्ये प्रश्नप्रत्रिका देणेत आली. तसेच सदर परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देणेत आली. परीक्षा कामकाज जिल्हयात सर्वत्र सुरळित पार पाडणेसाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची भरारी पथके करणेत आली होती. तसेच जिल्हा स्तरावरुन सपंर्क तालुक्यातील केंद्र भेटीचे नियोजन करणेत आले होते.


    या परीक्षेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या  अध्यक्षा, सौ. शिल्पा शशिकांत खोत,  उपाध्यक्ष,  तानाजी पाटील,  सभापती शिक्षण समिती शितल प्रविण यादव व  मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. जास्मिन यांचे परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर परीक्षेकरीता कोल्हापूर जिल्हा परीषदेकडील परीक्षा विभाग प्रमुख विस्तार अधिकारी आर. वाय. ठोकळ,  शशिकांत बडे,उपशिक्षणाधिकारी,  आर. व्ही. कांबळे, विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे, विस्तार अधिकारी  दिपा भोसले, व.सहा. व  डी. एच. पाटील कनि. सहा. गौरव पोवार, कनि. सहा. राजेंद्र धनवडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी परीक्षा कामकाजात मोलाची मदत केली. विभागातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पडली.


               ----------------------