कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड मधील माधवनगर हे नावाप्रमाणेच कृष्ण आणि शिवभक्तांचे नगर.सुंदर शिवमंदिर असल्याने प्रत्येक सोमवारी भक्तांची आणि शाळा कॉलेजला जाणाऱ्या विदयार्थी विदयार्थीनिंची नेहमीच गर्दी. येथून अवघ्या दीड किलोमीटर वर पूर्वेला सदाशिवराव मंडलिक कॉलेज आणि पश्चिमेला शिवराज विद्यालय आणि संस्कार भवन.पण या डांबरी रस्त्याला जोडणारा माधवनगरचा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता म्हणजे नुसता चिखलच चिखल.शेजारून जाणाऱ्या कॅनॉल मुळे या रस्ता रोजच राडीचे मेक अप करून पोरांची वाट बघत सज्ज असायचा. मोटर सायकल वाल्यांना सपाटून आपटायचा.सायकल वाल्यांची तीच अवस्था. निदान सायकल उचलून नेता येत होती.
रस्त्याची ही अवस्था पाहून या प्रभागाच्या नूतन नगरसेविका सौ.गीतांजली आंगज अस्वस्थ झाल्या.डांबरीकरणाचे नंतर पाहू. पोरं पडता कामा नयेत. त्यांनी विना विलंब वीस ट्रॉल्या मुरूम टाकण्याची व्यवस्था केली. नगरपालिकेचा रस्ते विभाग झटकन कामाला लागला. विशेष म्हणजे त्यांचे पती संभाजी आंगज सुद्धा मदतीला आले. एवढेच नव्हे तर इंजिनियर असलेले पुत्र मयूर आंगज पण आईच्या मदतीला धावून आले.ताईंची तत्परता पाहून माधवनगरचे नागरिक सुद्धा मदतीला धावून आले. जनसेवेचा एक आगळा वेगळा आयाम माधव नगरच्या नागरिकांनी पाहिला. माजी खासदार संजय दादा मंडलिक यांनी सुद्धा या रस्त्यावरून जाताना ही समस्या अनुभवली होती. समस्या दूर झाल्याचे कळताच त्यांनीही ताईंचे अभिनंदन केले. डांबरी करणातल्या तांत्रिक अडचणी दूर करून तेही पुढे करून घेऊ असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक राहूल शिंदे यांनीही ताईंना सहकार्य केले. शिवाय चिदंबरम एकल, रामभाऊ खराडे, अजय खराडे ,सागर भुतल, वैभव नरके, राम ढेरे. पूर्णांनंद एकल, धनाजी गोधडे यांचे ही मोठे योगदान लाभले.
सौ. गीतांजली ताईंनी यावर नम्र प्रतिक्रिया देतांना म्हंटले, "आम्हीं सर्व जनतेच्या सेवेसी सदैव तत्पर."
--------------------------
.

