मुरगूडचे ग्रामदैवत हनुमान मंदिर मध्ये हनुमान जयंती उत्साहाने साजरी.

Kolhapur news
By -

 


           


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


        मुरगूड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरातील हनुमान जयंती असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाने साजरी झाली ,हनुमान तरुण मंडळ या उत्साही मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी व भाविकांनी ही जयंती साजरी केली आहे.


   या  मंदिरात दर शनिवारी आणि मंगळवारी भक्तांची मोठी गर्दी असते.हे मंदिर प्रमुख मंदिरापैकी एक असून प्राचीन हेमाड पंथी नक्षीदार बांधकामामुळे त्याचे सौंदर्य अधिक वाढले आहे. नवसाला पावणारा हा हनुमान आहे अशी भाविकांची श्रद्धा असून जयंती दिवशी  जनसागर लोटला होता..


    विविध रंगांच्या फुलांनी सजवलेली आरास आणि विद्युत रोषणाई यामुळे उत्सवाचे भव्य स्वरूप पहायला मिळाले.उत्सवात मंगलमय वातावरणात विविध आरत्या म्हणण्यात  आल्या.आणि फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.


  हनुमान तरुण मंडळ मुरगूड च्या युवकांनी यात मोठे योगदान दिले असून महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे असे ग्रामस्थांना सांगण्यात आले.




            ----------------------------------