कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बारामती : अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवणार. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच पद्धतीने मी तुमची सेवा करेल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी दिले.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या.
अजितदादा आपल्यात नाहीत हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ही चित्रफीत पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणात भावनांचा कल्लोळ माजला आहे. अजितदादांच्या शिवाय सभा घ्यावी लागेल असे कधी वाटले नाही. अजितदादांनी अपार कष्ट करून ही बारामती उभी केली. आज बारामतीमधील आबाल-वृद्ध अजूनही शोकाकुल आहेत. अजितदादांची भाषण ऐकतात, इथली जनता अजूनही त्याच भावनेत आहे. त्यामुळे दादा आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. मात्र अजितदादा आपल्यात नाही हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामतीकरांच्या मनात अजितदादांच्यासाठी अपार श्रद्धा आहे. ही केवळ साथ नाही, तर भावनेने बांधलेली घट्ट नाळ आहे आणि हीच खरी ताकद आहे. दादांच्या पुण्याईने संपूर्ण बारामतीकडून आणि राज्यातून मला आणि माझ्या दोन मुलांना खंबीर पाठिंबा मिळाला. आज मी इथे उभी आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून. फक्त उमेदवार म्हणून नाही, दादांची स्वप्न घेऊन उभी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रणांगणात उतरली आहे. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की माझ्या पाठीशी बारामतीकरांची ताकद आहे.
आज मी केवळ मत मागायला आलेली नाही. माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. माझं दुःख फार मोठं आहे. पण मी तुमच्या सर्वांच्या आधाराने पुढे चालत राहण्याचा निर्धार केला आहे. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्याच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करेल. दुःखाल कवटाळून न बसता मी विकास कामासाठी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवणार. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्याच पद्धतीने मी तुमची सेवा करेल.
--------------------------------

