कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आहे.131 व्या घटना दुरुस्ती विध्ये यकास उपस्थित सदस्यांच्या दोन तृतीयांश म्हणजे 352 मते पडायला हवी होती पण 298 मते पडली. विरोधकांची 230 मते होती.
विरोधकांची कांही मते किंवा निदान महिलां खासदारांची मते फुटतील अशी अपेक्षा एन डी ए सरकारने बाळगली होती. खरं म्हणजे ही विषाची परीक्षा होती की राजनीती मधील मुच्छद्देगिरी होती हे कळायला मार्ग नाही.
विराधी नेते खर्गे, राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी आधीच सांगितले होते की हे बिल पास होऊ देणार नाही.
पंतप्रधान मोदी, गृह मंत्री अमित शहा, रिजीजू, दुबे इत्यादीनी नारिशक्ती वंदन म्हणून भावनिक आवाहन पण केले होते.
पण ते व्यर्थ ठरले.
Reading between the lines
या तत्वा नुसार हे बिल फेटाळाले गेल्याने मोदी सरकारला महिलांची मोठी सहानुभूती मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जाते . अर्थात हे जर तर चे विधान होईल. पुरुषप्रधान समाज रचनेमध्ये पती सांगेल त्यांनाच मतदान करण्याची मानसिकता ग्रामीण विवाहीत महिलांमध्ये पहायला मिळते.स्वतंत्र विचार करण्याची कुवत शहरी महिला व तरुणींमध्ये मध्ये मात्र पहायला मिळते.
सध्या पश्चिम बंगालची निवडणूक गाजत आहे. महिलां वरील अत्याचार प्रकरण व त्यांची असुरक्षितता यामुळे आधीच ममता बॅनर्जी ना तेथील महिलांचा विरोध दिसून येत आहे. विरोधकांच्या मुळे महिला बिल फेटाळले गेल्याने ममता सरकार च्या विरोधात वातावरण निश्चित तयार होईल असे म्हणायला वाव आहे.
इकडे विरोधकांची अवस्था 99 धावावर आऊट झालेल्या फलंदाजा सारखी झाली आहे. भारतीय जवानांच्या शौर्यावर शंका घेणारी पोरकट विधाने करणाऱ्या आणि नरेंद्र मोदींना जादूगार म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना उगीचच उसने अवसान आणावे लागले आहे.
2029 च्या लोकसभा निवडणुकीची पेरणी भावनिक आवाहनाची सेंद्रिय खते घालून एन डी ए ने केली आहे असा ही कयास बांधला जातो.
उरलेली दोन विध्येयके म्हणजे सीमांकन विध्येयक व केंद्र शासित प्रदेशाशी संबंधित असलेले विध्येयक लगेच मागे घेऊन रिजूजीनी मुत्सद्धी पणा दाखवला आहे.
एका दगडात पाडाला आलेले दोन तीन हाऊस आंबे एन डी ए ने आपल्या ओट्यात पाडून घेतले आहेत असे ही म्हंटले जाते.
नजीकच्या काळात या सर्वांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
तूर्त वाट पाहू.
----------------------

