कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पत्रकार आणि छायाचित्रकार हे समाजाचे जागरूक डोळे आणि संवेदनशील आवाज आहेत. सत्य घटनांना लोकांसमोर प्रामाणिकपणे मांडण्याचे मोठे कार्य ते करत असतात. अनेकदा कठीण परिस्थितीतही त्यांनी समाजहितासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या द्वैवार्षिक पुरस्कारांचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी पुरस्कारप्राप्त पत्रकार, छायाचित्रकार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांच्या ' घडलंय बिघडलंय ' या पुस्तकाचे प्रकाशनही यानिमित्ताने झाले.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, प्रिंट मीडिया समाजाला विचार करायला लावतो, तर डिजिटल मीडिया समाजाला तात्काळ जागं करतो. पण दोन्ही माध्यमांचा आत्मा एकच आहे - सत्य, जबाबदारी आणि जनतेचा आवाज ! लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता खंबीर राहिली तरच सत्य लोकांसमोर येईल. नाविन्य जपण्याचे चॅलेंज पत्रकारांसमोर आहे. पत्रकारांच्या घराचा प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही सुरू केले आणि आता ते पूर्णत्वाकडे येतेय याचे समाधान आहे. कोल्हापूर प्रेस क्लबच्या नवीन इमारतीसाठी तसेच पत्रकारांच्या विशेष बातम्यांचे डिजिटलायझेश करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू.
यावेळी वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील,अनिल कदम, सुरेंद्र जैन, जयेश ओसवाल यांच्यासह प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे,उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे,खजानिस दिपक घाटगे,सचिव बाबुराव रानगे, समीर देशपांडे आणि प्रेस क्लबचे संचालक, पत्रकार, छायाचित्रकार उपस्थित होते.
य -------------------------------


