कोल्हापूर न्यूज नेटवर्क
निपाणी शहराची ओळख चळवळीचे व परिवर्तनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येणाऱ्या काळात या शहराची ओळख वृक्षांचे शहर म्हणून झाली पाहिजे. असे प्रतिपादन निपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे यांनी वृक्षमित्र विठ्ठल वाघमोडे यांची नेचर क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना केले.
यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दीपक वळीवडे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांचा संयुक्तपणे निपाणी फाउंडेशन निपाणी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष एन आय खोत, प्रा नानासाहेब जामदार, साहित्यिक कबीर वराळे गुरुजी, निपाणी नागरिक मंचचे अध्यक्ष सुनील पोळ, महेंद्र सांगावकर, फोर जेआर ह्यूमन राईट संघटनेचे अशोक खांडेकर, उद्योजक दीपक इंगवले, बाबासाहेब मगदूम, रयत संघटनेचे शहर उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे मोहन कोकाटे , इ. मान्यवर उपस्थित होते.
-------------------


