शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदावर डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती

Kolhapur news
By -

 


               

                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी डॉ. ज्योती प्रफुल्ल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रकुलगुरू ठरल्या. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर के कामत यांनी त्या संदर्भातील आदेश सोमवारी 25 मे 2026 रोजी काढले. ज्योती जाधव यांची सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी नियुक्ती झाली. 


शिवाजी विद्यापीठात त्या दोन दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत. जागतिक स्तरावरच्या शास्त्रज्ञ आहेत. बायो केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या प्रोफेसर आहेत. यापूर्वी त्यांनी जवळपास नऊ महिने शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आर के कामत यांची नियुक्ती झाली. कुलगुरू कामत यांनी सोमवारी, डॉ ज्योती जाधव यांची प्रकुलगुरुपदी नियुक्तीचा आदेश काढला.


    शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्याबद्दल डॉ. ज्योती जाधव यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना 'लर्नर टू अर्नर' बनविणारे शिक्षण देणे, विद्यापीठातील संशोधनाला जागतिक ओळख प्राप्त करून देणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव उपक्रम राबविणे या त्रिसूत्रीवर काम करीत विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्याचा मानस डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.


      --------------------------