'माणसाला सक्षम व सुसंस्कृत करण्यामध्ये साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका" - माजी प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार : उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

Kolhapur news
By -

 

         
        



                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क  



      माणूस घडवण्यामध्ये, माणसाला सक्षम व सुसंस्कृत करण्यामध्ये  साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे." असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी केले. 


    कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूलमध्ये शाहू वाचनालय आणि अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी यांच्यावतीने आयोजित उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ माजी अधिष्ठाता डॉ.के.एन.सांगळे होते. 


      माजी प्राचार्य डॉ.कुंभार म्हणाले,"दर्जेदार लेखन हे चोखंदळ वाचक वाचत असतात.त्यामुळे दर्जेदार लेखन महत्त्वपूर्ण आहे." 


    अक्षरसागर साहित्य मंचचे डॉ.मा.ग. गुरव हे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले ," महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे प्रसारमाध्यम विभाग समग्रशिक्षा सन २०२४-२५ अंतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मिती उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी व शिक्षकांच्या १० पुस्तकांची निवड झाली.या दहा लेखकांचा सन्मान गारगोटीतील शाहू वाचनालय व अक्षर सागर साहित्य मंच यांच्यावतीने उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देऊन करीत आहोत." 


     माजी प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार,माजी अधिष्ठाता डॉ.के.एन.सांगळे यांच्याहस्ते डॉ. श्रीकांत पाटील,प्रा.रवींद्र पाटील,ऋतुजा गुरव,मधुकर मुसळे,प्रणिता तेली,सादिया मुजावर,संगीता अलगौंडर,सचिन रोडे,सुभाष चोपडे आदींना त्यांच्या ग्रंथ लेखनाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.मा.ग.गुरव यांचा सत्कार पुरस्कारप्राप्त लेखकांतर्फे करण्यात आला.


   पुरस्कार प्राप्त लेखकांनी मनोगत व्यक्त केले.बालकुमार साहित्य सभेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत निकाडे म्हणाले," सृजनशील व सर्जनशील साहित्य निर्मिती ही काळाची गरज आहे."


प्रा.सुमन वांगीकर म्हणाल्या,"ज्ञानगंध उधळीत जा तुम्ही,ज्ञानगंध शिंपीत जा तुम्ही,अभिमान व्हावा सर्वांना,असे कार्य लेखणीतून करत जा तुम्ही" प्रा.व्ही.एन.भंडारे, माजी मुख्याध्यापक व्ही.एन.देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.   

 

  अध्यक्षीय भाषणात माजी अधिव्याख्याता डॉ.के.एन.सांगळे म्हणाले," समाजजागृती व समाजप्रबोधन करण्याचे फार मोठे सामर्थ्य साहित्यामध्ये आहे.त्यामुळे उत्कृष्ट साहित्य लेखन गरजेचे आहे." 


  यावेळी अक्षर सागर साहित्य मंचच्या उपाध्यक्षा राणी हुजरे-पाटील,मनोहर भोसले उपप्राचार्या सौ.भानुसे,सौ. देसाई, सौ.भोसले आदी उपस्थित होते.सुभाष चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.ऋतुजा गुरव यांनी आभार मानले.


कोल्हापूर : गारगोटीच्या शाहू वाचनालय व अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार डॉ.के.एन.सांगळे,डॉ.अर्जुन कुंभार यांच्याहस्ते स्वीकारताना डॉ.श्रीकांत पाटील, प्रा.रवींद्र पाटील आदी 



        --------------------------------