जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे मुरगूड नगराध्यक्षांचे नागरिकांना आवाहन.

Kolhapur news
By -

 



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


लांबलेल्या पावसामुळे तलावातील पाणी साठा कमि झाला आहे. पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यास अनुसरून पालिकेने आठवड्यातून एक दिवस ड्राय डे ठेवला आहे. नळांना तोट्या बसून घ्याव्यात व पाण्याचा अपव्यय टाळावा. नळ धारकांनी पालिकेच्या कर्मचारांना जादा पाणी सोडण्यासाठी दमदाटी करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तलावातील पाण्याची पातळी एकदम खाली गेल्याने गाळामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे.


    दूषित पाण्याच्या प्रादुर्भावाने आजारी पडलेले अनेक रुग्ण सरकारी व खाजगी दवाखान्यात दाखल होत आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 


    मान्सून च्या आगमनाची लक्षणें दिसत असली तरी पाण्याची पातळी वाढायला ऑगस्ट उजाडेल.

आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन मुरगूडच्या नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्र. पाटील यांनी नागरिकांना केले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य डॉक्टरांनी ही नागरिकांना असेच आवाहन केले आहे.





        -----------------------------