मुरगूडच्या बकरी बाजारला जत्रेचे स्वरूप.नियोजनाचा अभाव असल्याने वाहतूक ठप्प.

Kolhapur news
By -

 

                   



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


      मुरगूड येथील सर पिराजी रोड वर दर मंगळवारी भरणाऱ्या बकरी बाजार ला एखाद्या जत्रेचे स्वरूप येते. बकरी मालक किंवा व्यापारी आणि ग्राहक रस्त्यावर च उभे राहून  व्यवहार ठरवत असतात. जोरजोराने ओरडत असतात. कांही वेळा भांडणे सुद्धा होत असतात.


  या बाजाराला योग्य नियोजन नसते. पिण्याचे पाणी किंवा स्वच्छता गृहाचा सुद्धा अभाव आहे.आजूबाजूस निवासी इमारती, बालवाडी व सरकारी रजिस्ट्रार कार्यालय आहे. कोपऱ्यावरच हा बाजार भरत असल्याने सर पिराजी रोड व बाजारपेठ दरम्यान होणारी वाहतूक ठप्प झालेली असते.


  दर मंगळवारी  सकाळ पासूनच हा बाजार भरत असतो. मुरगूडचा जनावरांचा बाजार महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध आहे. तो ही दर मंगळवारी स्वतंत्र भरवला जातो. नगरपरिषदेने तेथे आवश्यक त्या सुविधा पुरवल्या आहेत. कांही त्रुटी राहिल्या असतील तर त्याही पूर्ण करण्याचे काम टप्प्या टप्प्या ने सुरु आहे.


    बकरी बाजार मात्र भर रस्त्यावरच भरत असल्याने ऐन बाजार दिवशी वाहतूक ठप्प होते.या बाजाराचे योग्य नियोजन व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


             -----------------------