कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"केंद्र व राज्य सरकारच्या विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती यांचा लाभ विद्यार्थ्यांनी सजग राहून घ्यावा." असे प्रतिपादन अनुगामी लोकराज्य महाभियानचे उपविभाग समन्वयक केदार माळवदे यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात आयोजित शैक्षणिक शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.भाग समन्वयक अजित कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.बी.कोळेकर होते.
ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री माळवदे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती यांची माहिती दिली. अजित कोळी यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी १ जुलै ते २० जुलै या कालावधीत कौशल्य आधारित प्रशिक्षण आयोजित केल्याची माहिती दिली.
प्राचार्य डॉ.जी.बी.कोळेकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले," विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपला विकास साधावा."
यावेळी प्रा.दिनकर पाटील,प्रा. अरविंद वाघमोडे,प्रा.सुनीता पाटील,प्रा. वैशाली हावळे,प्रा.रॉबर्ट बारदेसकर,प्रा.शहाजी गडदे,प्रा.हेमांगी वडेर आदी उपस्थित होते. प्रा.सुहास इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.मनीष साळुंखे यांनी आभार मानले.
----------------------


