छत्रपती राजर्षी शाहू महाराज दिनी विद्यार्थ्यांनी केला मैत्री अभ्यासाचा संकल्प

Kolhapur news
By -

 


          




                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर जिल्हा परिषद संचलित परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय /वसतिगृह गगनबावडा मध्ये आज राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी शाळेतील मुला-मुलींनी मैत्री अभ्यासाचा संकल्प करून आगळ्यावेगळ्या प्रकारे शाहू महाराजांना वंदन केले. 



'बहुजन हिताय बहुजन सुखाय 'या ध्येयानेच आपल्या संस्थानाला विकासाचा आदर्श बनवलेल्या आणि समतेचा मूलमंत्र देणारे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण आज प्रशालेत विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गीत व कविता सादरीकरणातून केले. शाळा व वस्तीगृहातील वाढलेली पटसंख्या लक्षात घेता ज्या मुला - मुलींचा ज्या ज्या विषयात हातखंडा आहे अशा मुला मुलींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या विषयातील मागे असणाऱ्या मुला मुलींना आपल्या सोबत घ्यावे.. त्या विषयात त्यांची प्रगती साधावी हा मैत्री अभ्यासाचा उपक्रम मुख्याध्यापक रंगराव गोसावी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला .



राज्यातील एक आदर्श शिक्षक वारे गुरुजी यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादातून मुख्याध्यापक रंगराव गोसावी यांनी हा उपक्रम प्रशालेत राबवण्याचा ठरवला. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यासाठी अगदी उत्स्फूर्तपणे तयारी दाखवली आहे .आज या जयंतीदिनी मुख्याध्यापकांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी गृहप्रमुखा सौ .गीता पाटील, निशा सुतार व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. 



     गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकराजा छ राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले .यावेळी उपस्थित मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी


               ---------------------------