कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत सामाजिक,साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.रवींद्र पाटील यांचे जीवन आदर्शवत आहे."असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी केले.
येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील ज्युनिअर विभागप्रमुख प्रा. रवींद्र पाटील यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे होते.
प्राचार्य डॉ.जी.बी.कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.मोहन सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.डॉ.अमर कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले.सेवानिवृत्तीबद्दल प्रा.रवींद्र पाटील यांचा सत्कार डॉ.माणिकराव साळुंखे यांच्याहस्ते करण्यात आला.सौ.वैशाली रवींद्र पाटील यांचा सत्कार माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई यांच्याहस्ते करण्यात आला.
माजी शिक्षकआमदार भगवानराव साळुंखे म्हणाले," प्रा.रवींद्र पाटील यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे.या पुढे त्यांनी शिक्षण वाचवा देश वाचवा अभियानामध्ये योगदान द्यावे."
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.राजेंद्र डांगे,श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष ए.आर.तांबे,शिक्षकनेते दादासाहेब लाड,माजी शिक्षणाधिकारी बी.बी. भंडारे,नगरसेवक दयासागर मोरे,प्रा.डॉ. आप्पासाहेब शेळके,प्रा.अरविंद वाघमोडे यांची भाषणे झाली.प्रा.रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील,कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले,बालाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष मदनराव कारंडे,संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई,हिराताई मुसाई,संस्थेचे संचालक छगनराव नांगरे,जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे,पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील,कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी, बापूसाहेब ठोंबरे,बी.डी.पाटील,सुनील इंगवले,इचलकरंजीचे नगरसेवक सयाजीराव चव्हाण,पंचायत समितीचे उपसभापती दीपक वाडकर,नगरसेवक अमर वरुटे,माजी सरपंच नूरमहंमद मुजावर,माजी प्राचार्य डी.बी. जुजारे,तलाठी किशोर पाटील,एन.एन.काझी ,सागर परीट,विवेक स्वामी,पैलवान अण्णासो निंबाळकर,बाबासो कोकणे आदी उपस्थित होते.प्रा.सुनीता तेलसिंगे,प्रा.सुहास इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.रमेश पाटील यांनी आभार मानले.
हातकणंगले ; अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील प्रा.रवींद्र पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे,माजीमंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे, हिराताई मुसाई आदी.
-----------------------------


