पटाया येथे भारतीय महिला कुस्ती संघाला सलग दुसऱ्यांदा आशियाई उपविजेतेपद! : दादासो लवटे यांचे कुशल प्रशिक्षण.

Kolhapur news
By -

 


                     

                  

             


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 


मुरगुडचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे  यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भारताच्या १५ वर्षांखालील महिला कुस्ती संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा तिरंगा फडकावला आहे. थायलंडमधील पटाया येथे   झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला संघाने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह *'सांघिक उपविजेतेपद'* (दुसरा क्रमांक) पटकावले. लवटे यांच्या कुस्ती स्पर्धेतील रणनीतीमुळे भारतीय रणरागिणींनी मिळवलेला हा मानाचा चषक आता मायदेशी येत आहे.



विशेष म्हणजे  हा सलग दुसरा आंतरराष्ट्रीय विजय आहे. गेल्या वर्षी (२०२५) किर्गिस्थान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १५ वर्षांखालील भारतीय महिला संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली होती. एकाच वयोगटातील संघाला सलग दोन वर्षे आशिया खंडात उपविजेतेपद मिळवून देण्याचा ऐतिहासिक विक्रम लवटे सरांनी आपल्या मार्गदर्शनाखाली करून दाखवला आहे.



या दैदिप्यमान कामगिरीबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह, लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल (मुरगुड) चे प्रमुख व माजी खासदार संजय दादा मंडलिक, संकुलाचे कार्याध्यक्ष ॲड. विरेंद्र भैय्या मंडलिक यांनी प्रशिक्षक लवटे यांचे विशेष अभिनंदन केले.


तसेच,SAI चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण  आणि मंडलिक संकुलातील खेळाडूंना सेवाभावाने वैद्यकीय सेवा देणारे डॉ.प्रशांत अथनी यांनीही लवटे यांच्या या यशाचे कौतुक केले.  भविष्यातही देशासाठी असेच जागतिक दर्जाचे मल्ल घडत राहो,अशा सदिच्छा यावेळी सर्व मान्यवरांनी दिल्या.


              ----------------------------