कागल मध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते "अनुश्री मिल्क प्रॉडक्ट" शॉपचे उद्घाटन

Kolhapur news
By -

 

               


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 


जयसिंगराव पार्क कागल येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अनुश्री मिल्क प्रॉडक्ट या शॉप चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.



या वेळी बोलताना नामदार मुश्रीफ म्हणाले,  जयसिंगराव पार्कमध्ये उच्चभ्रु लोक राहत असल्यामुळे येथे दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता भासत होती .हे जाणून डॉक्टर अनिल भोसले व त्यांच्या पत्नी वृषाली यांनी अनुश्री मिल्क प्रॉडक्ट काढून येथील लोकांची गैरसोय दूर केली आहे .



 जिल्हा बँकेचे संचालक भैया माने  म्हणाले , अनुश्री मिल्क प्रॉडक्ट या शाखेचे उद्घाटन करताना विशेष आनंद आणि आम्ही अभिमान वाटत आहे, कारण डॉक्टर अनिल भोसले हे निमित्त आहेत .पण याचे सर्व श्रेय आणि कष्ट त्यांची पत्नी, मुलगी अनुश्री यांचे आहे. त्यांना माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते येथून पुढे सुद्धा देण्याचे वचन देतो. हा प्रोजेक्ट लवकरात लवकर नावारुपास यावा अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली  .



या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव कवाळे  म्हणाले, करवीर नगरीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन समतेचा संदेश दिला होता , आजही छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज्यांच्या वाटेवरून चालणाऱ्या नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते व आपल्या लेकीच्या अनुश्री या नावाने शुभारंभ केलेल्या शॉपिस मनापासून शुभेच्छा! निश्चितच अनुश्री हे नाव मिल्क प्रॉडक्ट मध्ये ब्रँड नेम होईल. स्वागत कुमारी प्रतीक्षा भोसले यांनी केले.



या कार्यक्रमास नगरसेवक अमित पिष्टे, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले , संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान , माजी सरपंच बाळासाहेब काटकर , सौरभ पाटील , माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, , पत्रकार जहांगीर शेख , प्रकाश तिराळे, अवधूत लोहार, सुनील कांबळे , पॉल सोनुले , प्रसिद्ध साहित्यिक आप्पासाहेब जकाते, दिलीप घाटगे, राजू रजपूत ,अमोल डोईफोडे ,अर्जुन नाईक ,संदीप कमळकर ,कीर्तीराज पाटणे, प्रशांत चव्हाण , प्रकाश हेगडे ,अमित जीरगे ,पॉल सोनुले, तन्मय भोसले  यांच्यासह इतर उपस्थित होते .आभार डॉक्टर अनिल भोसले यांनी मानले . 



 ------------------------------