दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात एकवटले गुरुजन

Kolhapur news
By -

 


     


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये नीट पेपर बाबत व अन्य शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करत होते. शासनाने त्यांच्याकडे व कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून सोनम वागचुक यांना जबरदस्तीने आणि अत्यंत क्रूर पद्धतीने उचलून दवाखान्यात भरती केले. त्यांचे आंदोलन चीरडण्याचा प्रयत्न केला. तसेच आज दिल्ली येथेझालेल्या आंदोलनामध्ये युवकांच्यावर  लाठी चार्ज करून अनेकांना जखमी केले. 


या सर्व गोष्टीचा निषेध  कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शासनाने या विद्यार्थ्यांच्या व शिक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन  दडपून न टाकता त्याला योग्य प्रतिसाद देऊन आंदोलनकर्त्याशी चर्चा करावी. शिक्षणाचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत. आपल्या या दडपशाहीच्या धोरणामुळे देशभरामध्ये तरुणांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याची दखल घ्यावी आणि हे विद्यार्थी, शिक्षण आणि तरुणांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना  दिलेल्या निवेदनात करण्यात आली. 


यावेळी शिष्टमंडळामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, शिक्षक नेते राजाराम वरुटे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, आयफेटोचे राष्ट्रीय महासचिव सुधाकर सावंत, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंदकर, समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, उमेश देसाई, महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे शिक्षक सेनेचे नेते संतोष आयरे, संजय पाटील, मनोहर सरगर, शिवाजी भोसले, उत्तम कुंभार, कुमार पाटील संदिप सुतार, यशवंत पाटील गोरख वातकर सर्जेराव नाईक, दिलीप माने  आदी उपस्थित होते


                           --------------