कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दिल्लीतील जंतर-मंतर येथे व नंतर आता रुग्णालयातून सुरू असलेल्या आंदोलनात उपोषण करणारे पर्यावरणवादी व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कागल तालुक्यातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक 22 जुलै रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात कागल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन आंदोलनास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, मंगळवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (एस.टी. स्टँड), कागल येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देतानाच विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या सोनम वांगचूक यांच्या भूमिकेला समर्थन व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय बहुजन वर्ग, कागल आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
--------------------

