नवी दिल्ली : कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलकांना जंतर मंतरवरून हटवण्यात आले आहे. पोलिसांनी व्यासपीठ मोकळे करून तंबू हटवले आहेत. आंदोलकांना तेथून हुसकावून लावले जात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जोरदार लाठीचार्जही केला.
दरम्यान, सीजेपीने अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी हे नाकारले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस लाठीचार्ज आणि संघर्षात अनेक आंदोलक जखमी झाले.
सकाळी १० वाजता आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने कूच केल्यावर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आंदोलक संसदेच्या जवळ पोहोचले.


