निपाणीतील तनवीर चा विश्वविक्रम

Kolhapur news
By -

 

             


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

  


     निपाणीतील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील शब्बीर जमादार यांचे चिरंजीव तनवीर याने काश्मीर लेह लद्दाख येथील सर्वात उंच 'उमलिंग ला' हे १९०२४ फूटावरील अंतर दुचाकीच्या सहाय्याने सर केले असून, जागतिक विक्रम करीत आपले नाव जागतिक स्तरावर नोंदविले आहे.  तनवीर शब्बीर जमादार वर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


तनवीर हा साहसवीर असून तो सध्या सोशल मिडीयावर कार्यरत आहे. तनवीर आणि त्याच्या सुमारे २० हून अधिक सहकाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी निपाणी येथून लेह लद्दाखकडे कूच केली होते. दि. ४ रोजी तनवीरने उमलिंग लेह शिखर विनासायास पार केले. त्याच्या या पराक्रमाबद्दल जागतिक नोंदी घेणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या नामांकीत संस्थेने त्यांचा विश्वविक्रमवीर म्हणून सन्मान पत्र देवून गौरव केला आहे. 


     तनवीर हा सोशल मिडीयावर कार्यरत असून त्याचे इन्स्टाग्रामवरसुमारे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर त्याचे सुमारे २००० हून अधिक व्हिडीओंना लाखों दर्शक प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे निपाणी व परिसरातून अभिनंदन केले जात आहे . 


                  ------------------------