गटशिक्षणाधिकारी सौ वसुंधरा कदम यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद : नरवेली शाळेच्या गुणवत्तेचे केले कौतुक

Kolhapur news
By -

 

              


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क    


 

  नरवेली ता .गगनबावडा येथील प्राथमिक शाळेमध्ये गटशिक्षणाधिकारी सौ .वसुंधरा कदम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्याशी सुसंवाद साधून अभ्यासातील प्रगतीचा आढावा घेत कौतुक केले .



 'बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले ' या उक्ती प्रमाणे प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून सर्व विद्यार्थ्यांचा वह्यांवरील अभ्यास तपासून, टेबलवर असलेल्या विविध भौमितिक आकारांच्या वस्तूंवर प्रश्न विचारले त्याचबरोबर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगती पाहून विशेष कौतुक केले. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी चे विद्यार्थ्यांचे गणिती पाढे पाठांतर, विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, सामान्य ज्ञान ,शालेय परसबाग ,शिष्यवृत्ती तयारी याबद्दल कौतुक केले . 



यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ . वसुंधरा कदम म्हणाल्या,या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील ज्ञानाबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक तंत्र वापरून त्यांच्यामधील गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे . ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत .याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम यांचा सत्कार करण्यात आला .



 शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत चे वर्ग असून 32 विद्यार्थी संख्या आहे .विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मुख्याध्यापक दशरथ गावडे यांनी आपल्या मनोगतातून दिली . यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ कुंभार, अप्रिना शेख,यशवंत लिंगायत उपस्थित होते .



     नरवेली ता .गगनबावडा येथील प्राथमिक शाळेमध्ये भेटी प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सौ. वसुंधरा कदम यांचा सत्कार करताना मान्यवर


            ---------------------