कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहराचे भौगोलिक स्थान असे आहे की गावाच्या उशाला तलाव आणि पायशाला नदी आहे. दोन्हीही भरून वहात आहेत. त्यात सरपिराजी तलाव अनेक नागरिकांच्या आवडीचा. वर्षभर लोक तलावावर फिरण्यासाठी गर्दी करतात.शिवप्रेमी दरवर्षी एकत्र येऊन स्वच्छता करतात. नागरिकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळावे यासाठी ही उत्स्फूर्त समाजसेवा असते.
चार दिवसाच्या वरुणाच्या संतत धारे मुळे तलाव पूर्ण भरून वाहू लागला. विधिपूर्वक मंत्रो चारासह जलपूजन करून शिवभक्तांनी आपला आनंद व्यक्त केला.पौरोहित्य अनुबोध गाडगीळ यांनी केले . नदी सद्या उसात शिरली आहे. ती ही शहराला पाणी पुरवते. ती पात्रात गेली की तिलाही पुजायचे.जलश्रोतांचे पूजन करण्याची ही परंपरा पर्यावरण संवर्धनाशी निगडित असल्याचे सांगितले जाते.
या पूजन सोहळ्यात सहभागी झालेले शिवप्रेमी या प्रमाणे. सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, नामदेव भराडे, आनंदा रामाणे, शिवाजी चौगुले, बाळासो भराडे, विनायक मेटकर, संकेत शहा, सुभाष अनावकर, अक्षय पोतदार, प्रकाश पारिषवाड, आनंदा मोरे, प्रफुल्ल कांबळे, इत्यादी अनेक.
---------------------------

