कोल्हापूर न्यूज/ वि रा भाेसले
वसंत : रवी, तुला काय वाटतंय? सरकारने विदयार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. यात विजय कोणाचा?
रवी : कोणाचा म्हणून काय विचारतोस. Gen Z चा. म्हणजे विदयार्थ्यांचा.
वसंत : तसं नव्हेरे, काँग्रेस वाले म्हणतात राहुल गांधी मैदानात उतरल्यामुळे सरकार घाबरले. आणि लगेच शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला.
रवि : एकदम चुक. खरं तर राहुल गांधी हे बॅक फूट वर गेले आहेत. कसं सांगू तुला समजावून! सरकारने वाटाघाटी करण्यासाठी सी जे पी ला बोलावले.राहुल गांधीला नाही.
सीजीपीचे आंदोलन एक महिना सुरू होते.राहुल गांधी फक्त दोन-तीन दिवसच. त्यात होते ते जंतर-मंतरवर गेले सुद्धा नाहीत. दुसरे म्हणजे राहुल गांधींना सरकार पाडायचे होते.मोदींचा राजीनामा आणि माफीनामा हवा होता.
शिवा: ( मध्येच येऊन.)काय चाललंय मित्रांनो? कसल्या वाटा घाटी? कसल्या आंदोलनाबद्दल बोलताय?
रवि /वसंत : अरे ते दिल्लीतले जंतर मंतर आंदोलन. आंदोलनाचे श्रेय कुणाला द्यायचे ?
शिवा : अर्थात Gen Z ला. म्हणजे देशभरातील या पिढीच्या युवकांना.त्यांनी आपल्या भवितव्याचा प्रश्न मांडला आहे. यापूर्वी असे घोटाळे झाले नव्हते असे नाही पण हा राष्ट्रीय पातळीवरचा घोटाळा होता. आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच विद्यार्थ्यांनी ताकद उभी केली. विरोधक शेवटी शेवटी आले. त्यांना आपला राजकीय मतलब हवा होता. विद्यार्थ्यांची ही ताकद सरकारच्या खूप उशिरा लक्षात आली. विरोधकांना जेव्हा ही ताकद समजली तेव्हा त्यांनी त्याचा लाभ उठवायचे ठरवले.
त्यांना सरकार पाडायचे होते. ते शक्य झाले नाही.
वसंत : मग सरकारने विद्यार्थ्यांच्या वर लाठीमार का केला आणि विद्यार्थ्यांनी दगडफेक तरी का केली ?
शिवा : जंतर-मंतर वर जमा झालेले देशभरातील विद्यार्थी हे अतिरेकी किंवा जिहादी नव्हते.ते पाप भिरू आणि कोवळ्या वयाचे होते. त्यात मुलीही होत्या.सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणामुळे त्यांच्या आंदोलनात हवा भरली. ते देशभर पसरू लागले. आणि सरकार खडबडून जागे झाले. त्यांनी दगडफेक केली नाही.भारतविरोधी विदेशी शक्ती याचा लाभ उठवुन देशात अराजक माजवू पाहत असाव्यात. निष्पाप विदयार्थी त्यात भरडले जातील. राष्ट्रात एक असंतोषाची लाट निर्माण होईल असेही सरकारला वाटले.Gen Z ही एक उमलती शक्ती विरीधकांच्या हाती लागू नये असा धूर्त विचार सत्ताधारी सरकारने केला आहे. शिक्षण मंत्री काय एक गेला आणि दुसरा आला.
विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित केलेच पाहिजे आणि त्यासाठी कडक कायदे केले पाहिजेत हे सरकारच्या लक्षात आले. ते मंत्रिमंडळाने केले ही आहेत.संसदेत बहुमत असल्याने ते मंजूर सुद्धा होतील. विशेष म्हणजे विरोधक सुद्धा त्याला आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
रवि : आता लक्षात आलं. विद्यार्थ्यांची ताकद किती असते हेही समजले. लाखो विद्यार्थ्यांच्या मागे त्यांचे पालक ही उभे असतात.भारताचा नेपाळ किंवा बांगलादेश करण्याचे विरोधकांचे स्वन भंगले आहे.Gen Z आंदोलनाचा हा मोठा विजय आहे. चला तर आपण सुद्धा या नव्या पिढीला शुभेच्छा देऊया.
----------------------------

