ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या धरतीवर ध्येय चिकाटीच्या जोरावर गरुड झेप घ्यावी - लोकनियुक्त सरपंच एम .जी .पाटील

Kolhapur news
By -

 

            


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क    


धुंदवडे  ता .गगनबावडा येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ व लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली .


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच एम .जी .पाटील होते .प्रास्ताविक मुख्याध्यापक विश्वनाथ चौगले यांनी केले .शिक्षण विभागामार्फत राबविण्यात  येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला व लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीतील प्रसंग विशद केले .



द्वितीय सत्रात शाळेतील विविध शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थी प्रमाणे - 


4 थी शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थी -


   करण दगडू पाटील ,

 अंजली प्रकाश जमादार,

 नंदिनी सर्जेराव गुरव, 

 सर्वेश संभाजी पाटील ,


5 वी शिष्यवृत्ती यशस्वी 


 श्रुतिका विक्रम मोरे ,

 आदर्श विलास पाटील,

आदित्य राजू हराळे,

 अन्वय रवींद्र कांबळे,

 अभिमन्यू कृष्णा चोरगे,

 तन्मय ज्ञानेश्वर कांबळे ,

 मारुती आनंदा पाटील, 


इयत्ता - 7 वी


 स्वराली रामदास पाटील ,

 माऊली सखाराम पाटील,

 समृद्धी कृष्णात चौधरी,


इयत्ता 8 वी -


 प्रथमेश कृष्णात पाटील 

 श्रद्धा एकनाथ चौधरी

 श्रावणी दगडू पाटील,


मिशन अंकुर परीक्षेत यशस्वी झालेले - श्रीहरी दिलीप पाटील ,आदित्य युवराज पाटील ,आदित्य अमृत सावंत ,या यशस्वी विद्यार्थ्यांचा लोकनियुक्त सरपंच एमजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .


यावेळी लोकनियुक्त सरपंच  पाटील म्हणाले,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या धरतीवर ,ध्येय, चिकाटीच्या जोरावर गरुड झेप घ्यावी,असे आहवान केले .


कार्यक्रमास संभाजी कांबळे , मारुती गुरव , सौ .सरिता देसाई,नवनाथ लिंगायत ,प्रसाद जाधव,ऋतुराज बामणीकर ,कृष्णा धोंड,अनिल लटके, संभाजी पाटील , रघुनाथ दळवी उपस्थित होते .


    धुंदवडे ता .गगनबावडा येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व मान्यवर .


      -------------------