माजी राज्यपाल जेष्ठ शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचे निधन

Kolhapur news
By -

            


        कोल्हापूर : माजी राज्यपाल व ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पद्मश्री  डॉ. डी. वाय. पाटील यांचे बुधवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल  होते. महाराष्ट्रामध्ये शिक्षणसम्राट ह्या उपाधीने ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय.पाटील ह्यांना १९९१ साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूरमधील अंबप गावात झाला होता. कोल्हापूरच्या मातीतले रांगडे व्यक्तिमत्त्व होते.


22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या डॉ. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प केला. त्यातून पुढे त्यांनी देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले.



सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी काँग्रेस पक्षातून केली. 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, पुढे सक्रिय राजकारणापासून दूर जात त्यांनी संपूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्राच्या उभारणीकडे केंद्रित केले.


1983 मध्ये नवी मुंबई येथे 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RAIT)'ची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील समूहाने देशभरात शिक्षणसंस्थांचे मोठे जाळे उभे केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे.


भाजपप्रणित एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर अनेक राज्यातील राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र, राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांचे राज्यपालपद कायम ठेवण्यात आले होते. तेव्हा डॉ. डी. वाय. पाटील हे बिहारचे राज्यपाल होते.


देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, तसेच नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान असो, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले. तिथे ठोस कामगिरी करत आपल्या नावाचं ब्रँड तयार केले. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे,  या विद्यापीठांचा समावेश आहे.


शेकडो शिक्षण संस्थांचे व्यापक नेटवर्क असलेला व गुणवत्तेमुळेराज्यातच नव्हे, तर देशभरात ओळखला जाणारा डी. वाय. पाटील ग्रुप शैक्षणिक वटवृक्ष बनला आहे. ग्रुपच्या विविध संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेलेलाखो विद्यार्थी आज देश-विदेशांत उच्चपदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देतानाच परंपरा जतन करून सुजाण नागरिक बनवण्यासाठी ग्रुपतर्फे नेहमीच प्रयत्न केला जातो.


‘जे कराल ते मनापासून करा. जिथे जाल तिथेसर्वोच्च बना,’ असा संदेश पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील नेहमी देत असतं.शिक्षण क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांनी घटनात्मक पदावरही काम केले. 2009 ते 2013 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर 2013 ते 2014 या काळात त्यांनी बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली. काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला.



नवी मुंबईतील जागतिक दर्जाचे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल, फुटबॉल स्पर्धा आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले.


डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला -कुलगुरू डॉ. राजनीश कामत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे महामेरू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केली .




          --------------------