कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले) येथील लोकसेवा शिक्षण संस्था संचलित बालावधूत हायस्कूल या शाळेच्या विद्यार्थिनींनी हातकणंगले येथे झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला .
़
या स्पर्धेत शाळेच्या कु . नसीमा किल्लेदार हिने ३९ किलो वजन गटात, कु . खुशबू हजारी हिने ४६ किलो वजन गटात, तर कु . मिसबा हजारी हिने ५३ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत क्रमांक मिळविला.
विशेष म्हणजे या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशामुळे बालावधूत हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालीला आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांना मिळालेले नियमित मार्गदर्शन, सराव आणि मेहनत यांचा मोठा वाटा आहे. या विद्यार्थिनींना कुस्तीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन जय हनुमान तालीम मंडळ, मौजे वडगाव यांच्या सौजन्याने लाभले. या विद्यार्थिनींच्या शानदार यशाबद्दल लोकसेवा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळा प्रशासन, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी त्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
------------------------------

