कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर हून मुरगूड ला मॉल साठी दीपावलीचा साबण घेऊन येणारा टँकर नंबर DD03 P 9289 गाव तलाव ते पेट्रोल पंप या रस्त्यावर गटारात अडकला. रस्त्याच्या कॉर्नर वर टँकर उजवीकडे वळवताना ही घटना घडली. ह्या रस्त्याच्या रुंदी करणाचा प्रस्ताव दोन महिन्या पुर्वीच नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत मंजूर झाला आहे. साधारण दिवाळी नंतर या कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते.दिवाळी पाडव्या दिवशी च अपघाताची ही घटना घडल्याने रस्ता रुंदीकरण व कॉर्नर आयलँड यांचे महत्व अधोरेखित झाले आहे.
टँकर चे मागील चाक गटारात इतके खोल फसले होते की ट्रॅक्टर ने ओढण्याचा प्रयत्न करून सुद्धा निघाले नाही. गावभाग व निपाणी ते राधानगरी या राज्य रस्त्याला जोडणारा हा रस्ता असल्याने दिवसरात्र रहदारी सुरू असते. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. नगरपरिषदेने विना विलंब या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
--------------------

