नवी दिल्ली : भाजपाचे लोक इंडिया आघाडीला प्रश्न विचारतात की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? पण मी भाजपाला प्रश्न विचारतो की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले गेले. मग आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?", असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
तिहार तुरुंगात अनेक दिवस काढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यानंतर आज त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. "पंतप्रधान मोदी 'एक देश, एक नेता' अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही मोठे नेते राजकीय पटलावर दिसणार नाहीत", असा दावा केजरीवाल यांनी केला. तसेच लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल आणि सप्टेंबर २०२५ नंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान होतील, असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे.
भाजपची सत्ता आल्यास त्यांच्या पक्षाच्या नियमाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर २०२५ ला ७५ वर्षाचे झाल्यानंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान होतील, त्यानंतर

