बेळगाव : भुतरामहट्टीजवळ टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 40 विद्यार्थी जखमी झाले असून जखमींवर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतची माहिती अशी की, कोल्हापूर येथील विद्यार्थी धारवाड विद्यापीठाच्या सहलीवर आले होते. त्यावेळी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देऊन कोल्हापूरला परतत असताना हा अपघात घडला. अपघातात कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.