चंद्रकांत माळवदे यांच्या पुस्तकास दुसरा पुरस्कार.

Kolhapur news
By -

 

                


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   चंद्रकांत माळवदे ,मुरगूड यांच्या गोवऱ्या व फुले या आत्मचरित्रपर पुस्तकास दुसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

     महागाव ता.गडहिंग्लज येथील प्रा.रसूल सोलापुरे बहु उद्देशिय संस्थे मार्फत 2024 चा राज्यस्तरीय पुरस्कार गोवऱ्या व फुले या पुस्तकास जाहीर झाला.

    अत्यंत गरिबीतून सुरू झालेल्या जीवनाला आव्हान देत निर्धाराने  समस्यांवर मात करत एक यशस्वी होता येते हे या पुस्तकाचे प्रेरणादायक सार आहे असे माळवदे यांनी सांगितले.

    आपल्याला आयुष्यात मदत करणाऱ्या व्यक्ती या ईश्वराचे रूप असतात असेही त्यांनी म्हंटले.

  त्यांच्या या पुस्तकाला यापूर्वीही एक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

    या प्रेरणादायक पुस्तकाचे तथा लेखक चंदकांत माळवदे यांचे कौतुक होत आहे.